नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर – पालकमंत्री नितेश राणे

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर – पालकमंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर – पालकमंत्री नितेश राणे*

*पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदेर उपकेंद्राचे लोकार्पण*

*मसुरे (प्रतिनिधी )*

आमदार निलेश राणे आणि मी सरकारचे प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या जिल्ह्यात आरोग्यसेवा चांगली मिळायला हवी असे खासदार नारायण राणे यांना नेहमी वाटते आणि त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून आम्ही प्रयत्न करत आहोत. आरोग्य केंद्राची इमारत दर्जेदार असून चालत नाही तर चांगली सेवा मिळणे महत्वाचे आहे. कमी असलेले कर्मचारी देण्याची जबाबदारी आम्ही येत्या काळात भरून काढू. नागरिकांना योग्य वैधकीय सेवा मिळायला हवी. याठिकाणी योगा केंद्र व्हावे. सर्व आरोग्य सेवक, सेविका, आशाताई यांनी हे आरोग्य केंद्र दर्जेदार बनविण्यामागे मेहनत करा. तुमच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यानी येथे केले.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 55 लाख निधीमधून बांधलेल्या चांदेर उपकेंद्र नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जी. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्य अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सौ सई धुरी, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सभापती प्रज्ञा चव्हाण, उप सभापती घनशाम झाड, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जीप सदस्या सौ क्षमा हडकर, प. स. सदस्य छोटू ठाकूर, योजना कांबळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आरोग्य सभापती प्रितेश राऊळ म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने चांगले आरोग्य मंदिर उभे झाले आहे. चांगली सेवा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. आरोग्य व्यवस्था बळकट होण्याचे आमचे प्रयत्न असणार आहेत असे सांगितले.
यावेळी तहसीलदार गणेश लव्हे, बिडीओ सौ परागिणी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुधीर धनगे, मसुरे वैधकीय अधिकारी डॉ. प्रियंका पाटील, डॉ. वीणा मेहेंदळे, डॉ. अंजली नेरुरकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, विस्तार अधिकारी सूरज बांगर, ग्रामपंचायत अधिकारी शंकर कोळसुलकर, वेरळ सरपंच धनंजय परब, माजी जीप अध्यक्ष सौ सरोज परब, संतोष पालव, राजेश गावकर, शिवाजी परब, महेश बागवे, जगदीश चव्हाण, दया देसाई तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यानी श्रीफळ फोडून तर जी प अध्यक्ष प्रमोद कामत यानी फीत कापून इमारत उदघाट्न केले. आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यानी मानले. ▪️कदाचित चांगल्या आमदाराच्या हस्ते उदघाट्नचा योग…! मागील चार वर्ष हे उपकेंद्र उदघाट्नाच्या प्रतीक्षेत होते असा उल्लेख मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यानी प्रस्ताविक करताना केला. हाच धागा पकडत पालकमंत्री नितेश राणे यानी भाषणाच्या सुरवातीला सांगितले की “कदाचित चांगल्या आमदाराच्या हातून” या उपकेंद्राचे लोकार्पण व्हायचे होते. त्यामुळेच आज या भागाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत या उपकेंद्राचे लोकार्पण झाले अशी कोटी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!