*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर प्रशालेचे गणित शिक्षक नेताजी जाधव यांना ‘ज्ञानसाधना सेवाव्रत आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर*
*शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुख्याध्यापकांकडून कौतुकाचा वर्षाव*
माध्यमिक अध्यापक संघ यांच्या वतीने ज्ञानसाधना सेवाव्रत आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यामंदिर माध्यमिक प्रशा लेतील गणित अध्यापक श्री नेताजी जाधव सर यांना प्रदान करण्यात आला. प्रशालेतील योग्य आणि प्रज्ञाशील शिक्षकाची अध्यापक संघाने निवड करून यशाची कमान उंच केली आहे नेताजी सर मित्तभाषिय आहेत अजादशत्रू आहेत कोणताच गर्वनाही अहंभावनाही शिक्षक कक्षात सुद्धा कधिच भेदभावनाही नेहमी वरिष्ठांशी आदराने वागणारे वरिष्ठांनी सांगितलेल्या कोणत्याच कामाला कधीच नकार नाही . संघर्षात्मक वाद कधिच नाही . नेताजी सर सतत शैक्षणिक विश्वात एकरूप असतात नवनविन तंत्र ज्ञान आत्मसात करून शाळेच्या प्रगतीचा विचार करणारे तळमळीचे शिक्षक . सुंदर शाळेच्या प्रगतीसाठी सतत अग्रेसर असलेले नेताजी सर शाळेच्या मूल्याकणा मध्ये आ घाडीवर राहून शाळेच्या विकासात भर घालणारे नेताजी जाधव सर म्हणजे शाळेचे भूषण आहेत आदर्श शिक्षकाचे सर्व गुण नेताजी सरांच्या अंतरंगात भिनलेले आहेत . अध्यापक संघाने नेताजींचे अचूक गुण हेरून विद्यामंदिर प्रशालेच्या यशाच्या शिखरात मानाचा तूरा खोवून आनंद द्विगुणित केल्याबद्दल मुख्याध्यापक या नात्याने मनापासून अभिनंदन !!

