नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी गुणगौरव, पालक सत्कार व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी गुणगौरव, पालक सत्कार व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे विद्यार्थी गुणगौरव, पालक सत्कार व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली येथे आज विद्यार्थी गुणगौरव, पालक सत्कार आणि माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत, प्रास्तावित ,विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गुणगौरव तसेच ज्या पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला सर्वांगीण विकासासाठी मोलाचे आर्थिक सहाय्य केले त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते.
या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, उपाध्यक्षा आरती पिळणकर, शिक्षण प्रेमी राजेंद्र कोलते, धीरज हूंबे, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, गावातील ज्येष्ठ नागरिक सहदेव परब, सदानंद पाटील, सुधाकर सावंत, कृष्णराव पवार, शिवराम राणे ,कृष्णा परब, बाळकृष्ण चव्हाण, मंगेश परब,आशिष पेडणेकर, जनार्दन पवार,सदाशिव राणे, प्रकाश दळवी, दिलीप पाटील, राजेंद्र तेली, सखाराम हुंबे, विनायक कुबडे, केशव दळवी, वासुदेव परब, मधुकर परब, अरुण पवार,शिवाजी चव्हाण, अनंत दळवी, सुभाष दळवी, विजय कोलते, चंद्रकांत मर्गज, निलेश तेली, दीपक शिंदे, अरुण पाटील, विजय आग्रे, पांडुरंग कोलते, अंकुश दळवी, गणेश साळसकर, सचिन परब, विजय राणे आदी ग्रामस्थ, महीला वर्ग व माजी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना जोशी मॅडम, सूत्रसंचालन पवार मॅडम तर आभार पाटील सर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!