बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम

बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम*

*कणकवली: सौ. संजना हळदिवे*

बेळणे खुर्द येथील श्री महापुरुष मंदिर परिसरात ‘श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळ’ आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री सत्यनारायण महापूजा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ मे रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी विविध ‘फनी गेम्स’ने होणार आहे. त्यानंतर ७ वाजता लहान मुलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी, ११ मे रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ५ वाजता सत्यनारायण आरती आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महाप्रसाद होणार आहे. रात्री ८.३० वाजता स्थानिक सुस्वर भजने, तर ९.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता ‘श्री सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली (मुंबई) यांच्या दणदणीत नाट्यप्रयोगाने होणार आहे.

तरी या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आणि तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री पावणादेवी लिंगेश्वर महापुरुष सेवा मंडळ, बेळणे खुर्द (वरचीवाडी) यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!