श्री सातेरीच्या तत्त्वज्ञास विधीनंतर दर्शनाला प्रारंभ

श्री सातेरीच्या तत्त्वज्ञास विधीनंतर दर्शनाला प्रारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*श्री सातेरीच्या तत्त्वज्ञास विधीनंतर दर्शनाला प्रारंभ*

*गुरूवारपासून शतचंडी महागाय अनुष्ठान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
– मळलेपन कार्यानंतर आज बुधवारी श्री देवी सातेरीचा तत्त्वज्ञास विधी पूर्ण झाला असून या विधीनंतर देवीची महापूजा बांधण्यात आली. तर महापुजेनंतर देवीच्या दर्शनाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, गुरूवापासून शतचंडी महागाय अनुष्ठान सोहळ्याला सुरूवात होणार आहे.
वेंगुर्ल्याची ग्रामदेवी श्री सातेरीचा मळलेपन विधी 13 एप्रिल रोजी करण्यात आला. त्यानंतर मळलेपनच्या अंगभूत कार्यसाठी 21 एप्रिलपर्यंत भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी देवीचा तत्त्वज्ञास विधी पूर्ण झाल्यानंतर देवीच्या दर्शनाला प्रारंभ झाला आहे. यावेळी भाविकांसह आजूबाजूच्या सीमधड¬ांनीही उपस्थित रहात देवीचे दर्शन घेतले. गुरूवारपासून (दि.23) या मंदिरात शतचंडी महागाय अनुष्ठान सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. दि.23 रोजी रात्री 10 वा. पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक, दि.24 रोजी सकाळी सप्तशती पाठवाचन, स्त्रियांसाठी सामूहिक कुंकूमार्चन, श्री सत्य अंबा व्रतपूजा, सायं. 7 वा. निमंत्रित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा, दि.25 रोजी सकाळी सप्तशती पाठवाचन, 9 कुमारिका पूजन, बलिदान, पूर्णाहूती, नैवेद्य, आरती, सायं. 7 वा.निमंत्रित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा, दि.26 रोजी सकाळी 9 वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. महाप्रसाद, सायं. 7 वा. सुश्राव्य भजन, रात्रौ 10 वा. सिद्धे·ार दशावतार मंडळाचे नाटक, दि.27 रोजी सकाळी 9 वा. भव्य रक्तदान शिबिर, रात्रौ 9 वा. श्री देवी सातेरी प्रासादिक नाट्य मंडळ परबवाडा यांचा ‘तु फक्त बोल’ हे दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे.
या सोहळ्यासाठी मंदिर, मंदिर परिसरात तसेच मंदिरात ज्या मार्गावारून प्रवेश केला जातो अशा तिन्ही मार्गांवर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच प्रवेशद्वारांवर स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री सातेरी देवस्थान वि·ास्त मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!