अॅड.देवदत्त परूळेकर यांना ‘मुळातून माणूस’ पुरस्कार

अॅड.देवदत्त परूळेकर यांना ‘मुळातून माणूस’ पुरस्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*अॅड.देवदत्त परूळेकर यांना ‘मुळातून माणूस’ पुरस्कार*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
माणसातील माणूसपण जपणाऱ्या आणि संवदेनशीलतेने समाजाशी संवाद साधणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी ‘सारद मजकूर’तर्फे दिला जाणारा ‘मुळातून माणूस’ हा पुरस्कार यंदा ज्येष्ठ निरूपणकार, लेखक, साहित्यिक आणि विचारवंत देवदत्त परूळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. मानवी मूल्ये जपण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान त्यांना जाहीर झाला आहे.
अॅड.परूळेकर यांनी माध्यम क्षेत्रात लेखन करताना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संत साहित्यिक विषयावर परखड व संवेदनशील लेखन केले आहे. त्यांच्या लेखनशैलीत स्पष्टता, अभ्यासू दृष्टिकोन, मानवी मूल्यांची जाणीव दिसून येते. सार्वजनिक व्याख्यानांमधून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक जाणीव, विवेकशीलता, मानवी नात्यांची उब यांचा ठसा उमटतो. हा सन्मान केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून मानवी संवेदलशीलतेचा गौरव असल्याची भावना व्यक्त होते.
या पुरस्काराचे वितरण 27 एप्रिल रोजी एस.एम.जोशी हॉल, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमात परूळेकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी अमृता आणि अभिजित हे संवादक सहभागी होणार आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन तेजस्विनी गांधी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!