सासोली-हेदूस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सासोली-हेदूस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

*कोंकण एक्सप्रेस*

*सासोली-हेदूस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार*

*दोडामार्ग : शुभम गवस *

सासोली-हेदूस येथे रविवारी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर (५५, रा. कुडासे-वानोशी) असे मृताचे नाव आहे. ते रस्त्यालगत दुचाकीसह उभे असताना पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या बसने नियंत्रण सुटून दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बस रस्त्याच्या कडेला जाऊन शेजारील हॉटेलला धडकली असून किरकोळ नुकसान झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. मृत हळणकर हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!