माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा

माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा*

*सिंधुदुर्ग :*

माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकारांवर असलेले त्यांचे विशेष प्रेम आणि जिव्हाळा यामुळे हा वाढदिवस अधिक अर्थपूर्ण ठरला.

प्रमोद जठार यांच्या ज्वलंत विचारांना आणि जनतेच्या प्रश्नांना पत्रकारांनी नेहमीच प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवले. सन २००९ मध्ये ते आमदार झाले, त्यामागे पत्रकारांच्या माध्यमातून कोकणातील जनतेचा आवाज सातत्याने पुढे नेण्याचे मोठे योगदान राहिले आहे.

सन २०१४ नंतर आमदार किंवा खासदार पदावर नसतानाही त्यांनी आपला राजकीय प्रवास कायम ठेवला. जनतेशी असलेली नाळ आणि पत्रकारांच्या माध्यमातून लोकांशी ठेवलेला संवाद यामुळे ते राजकारणात सक्रिय राहिले.

याच ऋणनिर्देश म्हणून यंदाचा वाढदिवस पत्रकारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!