न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेत सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेत सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेत सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ संपन्न*

*फोंडाघाट संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली हेच मी माझ्या जीवनाचे भाग्य समजतो.– श्री. अनंत विठ्ठल घाडी*

*फोडाघाट ः संजना हळदिवे*

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आर्ट्स् , कॉमर्स्, व्होकेशनल अँड सायन्स फोंडाघाट प्रशालेतील वरिष्ठ लिपिक श्री.अनंत विठ्ठल घाडी यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. म.ज.सावंत- पटेल, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. वि.तायशेटे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ संचालक श्री. राजन चिके, श्री. रंजन नेरूरकर, श्री. मनिष गांधी, श्री. सु.मा.सावंत श्री. आनंद मर्ये, सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. नारे सर, सत्कारमूर्ती श्री. अनंत विठ्ठल घाडी व सौ. घाडी वहिनी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.प्रसाद कृ.पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.प्रसाद कृ.पारकर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सर्वप्रथम स्वागत केले. तसेच आपल्या प्रास्ताविक मनोगतात उपस्थित मान्यवरांची ओळख तसेच श्री. अनंत घाडी सर यांच्या कौटुंबिक, आर्थिक व त्यांची काम करण्याची पद्धत, वेळेचे योग्य बंधन पाळून कामाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केले आहे. सर्वांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. ता. देवगड, जामसंडे येथे 34 वर्षे सेवा आणि आता फोंडाघाट हायस्कूलमध्ये एक वर्ष 14 महिने सेवा प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. व त्यांचे पुढील आयुष्य आरोग्य संपन्न व आनंदी जावो असे विचार व्यक्त केले. सत्कारमूर्ती श्री. अनंत घाडी सर व सौ. घाडी वहिनी यांचा फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यांचा सत्कार करण्यात आला, प्रशालेच्या वतीने सत्कारमूर्ती यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रसाद कृ. पारकर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन यांचा सत्कार केला ,सौ. घाडी वहिनी यांची खणा,नारळाने सौ. रेवडेकर मॅडम, सौ गोसावी मॅडम यांनी ओटी भरली. लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.चिंदरकर मॅडम,श्री डिसोजा सर,श्री. मिलिंद जाधव याने श्री. अनंत घाडी सर यांचे कामाविषयी असणारी प्रामाणिकता वेळेचे योग्य बंधन यांची सांगड घालून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली. सर्वांशी मिळून मिसळून आपलेपणाने वागले. तसेच आपल्या जीवनात घर आणि शाळा या दोन्ही भूमिका निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या.असे गौरव उद्गार काढले व त्यांना भावी आयुष्याच्या खूप शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. प्राचार्य श्री. नारे सर यांनी श्री. घाडी सर यांना भावी आयुष्य शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस,संचालक श्री. मनीष गांधी व श्री. रंजन नेरुरकर यांनी सत्कारमूर्ती श्री. अनंत घाडी यांनी एक वर्षच 14 महिन्याच्या कालावधी शाळेतील कार्यालयीन चांगली जबाबदारी पूर्ण करून शाळेला सहकार्य केलं आहे. तसेच त्यांच्या कामाचे कौतुक केले, त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा आपल्या मनोगतातून दिल्या. सत्कारमूर्ती श्री. अनंत घाडी यांनी आपल्या मनोगतातून फोंडाघाट संस्था आणि प्रशालेने मला एक वर्ष 14 महिने भरभरून प्रेम दिले. मी या संस्थेत जामसंडे हायस्कूल मधून सरप्लस होऊन आलो असता या शाळेने परके पणाची उणीव मला जाणवू दिली नाही ही शाळा माझी शाळा वाटते तसेच माझ्याकडून कामाच्या बाबतीमध्ये योग्य न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच माझी गरज या संस्थेला कधी लागली तरी मी तत्परतेने सहकार्य करेन असे विचार मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष फोंडाघाट सोसायटीचे चेअरमन मा. श्री. म.ज.सावंत यांनी श्री.अनंत घाडी यांना यांनी प्रामाणिकपणे आपल्या संस्थेसाठी काम केले. असा प्रामाणिक वरिष्ठ लिपिक आमच्या शाळेला लाभला हेच आम्ही भाग्य समजतो. त्यांचे भावी आयुष्य आरोग्य संपन्न व सुख-समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री.संतोष जोईल यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, श्री. घाडी सरांचे नातेवाईक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ. रेवडेकर मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!