*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडीत 5 एप्रिलपासून भव्य टेनिस बॉल खुली क्रिकेट स्पर्धा*
*नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजन*
*विविध राज्यातील आंतराष्ट्रीय खेळाडू होणार सहभागी*
*विजेता संघ पटकावणार 5,75,575 रू. चे बक्षीस*
*वैभववाडी प्रतिनिधी*
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार मा. नारायण राणे साहेबांच्या 75 वा वाढदिवस निमित्त भाजपा कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सिंधुनायक चषक 2026 या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत नाधवडे ता. वैभववाडी येथील श्री महादेव मंदिर मैदान येथे केले आहे.
पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग – रत्नागिरी – कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडू व क्रीडा प्रेमींसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पाहता येणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये देशभरातील अनेक संघ, खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राला चालना मिळणार आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा भव्यदिव्य असणार असून स्पर्धेसाठी डी जे साऊंड सिस्टीम, प्रेक्षकांसाठी उत्तम आसन व्यवस्था, लाईव्ह स्कोर, समालोचन व उत्तम दर्जाचे मैदान व्यवस्था करण्यात येणार आहे. ही स्पर्धा प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून या स्पर्धेत एकूण 64 संघांचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 5 लाख 75 हजार 575 रुपये तर द्वितीय क्रमांकास 2 लाख 75 हजार 575 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यामध्ये विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या सदर स्पर्धेसाठी सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे व या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक श्री. दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्री. मनोज रावराणे, वैभववाडी सभापती श्री. सिद्धेश रावराणे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, नारकर, मिलिंद मेस्त्री, सुधीर नकाशे व इतर मान्यवर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

