राज्य काजू परिषदेच्या व काजू बोर्डाच्या माध्यमातून यापुढे शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत :मनिष दळवी

राज्य काजू परिषदेच्या व काजू बोर्डाच्या माध्यमातून यापुढे शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत :मनिष दळवी

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्य काजू परिषदेच्या व काजू बोर्डाच्या माध्यमातून यापुढे शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत :मनिष दळवी*

*सिंधूनगरी-प्रतिनीधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा याच्यासाठी पालकमंत्री मा.श्री. नितेश राणे साहेब आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था ही सगळीच यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून आणि काजू बोर्डाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. चांगल्या दर्जाचा काजू आहे त्याला अधिकचा दर देण्याच्या संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली. तात्काळ या जिल्ह्यांमध्ये जवळपास २५ ते ३०केंद्रांवर खास करून विकास सहकारी संस्थांच्या केंद्रांवर काजू खरेदी करण्याची प्रक्रिया निश्चितपणे सुरू करू शासन मान्य करेल ते अनुदान आपल्याला या केंद्रांवर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. यासाठी प्रयत्न करणार आहोत.आत्ता तरी दहा रुपया अनुदान आपण प्रति किलो मागणी करीत आहोत परंतु जे काही अनुदान शासन मान्य करेल ते अनुदान आपल्याला या केंद्रांवर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे उपलब्ध होईल असा विश्वास अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया करणारे काजू कारखानदार आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत मनीष दळवी बोलत होते. या बैठकीस कृषी बाजार उत्पन्न समितीचे अध्यक्ष तुळशीदास राव राणे,काजू असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर,सचिव बिपिन वरसकर तसेच काजू कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून आणि काजू बोर्डाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अजून एक पाऊल म्हणून मागच्या आठवड्यामध्ये या जिल्ह्यातल्या विकास सहकारी संस्था आणि काजू प्रक्रिया दरात यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक झाली आणि आज जिल्हातली काजू प्रक्रिया करणारे काजू कारखानदार आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये जी केंद्र निश्चित केलेली आहेत त्या केंद्रांवरचा काजू खरेदी करण्यासंदर्भात आज या कारखानदारां बरोबर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झालेली आहे आता याची सुरुवात ही या एक आठवड्याभराच्या आत मध्ये करण्यासंदर्भातली सकारात्मक चर्चा झाली त्याच्यातले जे काही तांत्रिक बाबी आहेत या तांत्रिक बाबी आम्ही या एक-दोन दिवसांमध्ये पूर्ण करू आणि त्याच्यानंतर आम्ही तात्काळ या जिल्ह्यांमध्ये जवळपास २५ ते ३०केंद्रांवर विकास सहकारी संस्थांच्या केंद्रांवर काजू खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करू

या केंद्रांवर काजू विक्री केल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला फायदा होईल कारण याचा जो दर निश्चिती आहे जरी बाजारभावाप्रमाणे आपण तर निश्चित करणार असलो तरी ज्याचा चांगल्या दर्जाचा काजू आहे त्याला अधिकचा दर देण्याच्या संदर्भात आज चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही चांगल्या दर्जाच्या काजूला त्या ठिकाणी चांगला दर मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहोत आणि त्यामुळे या केंद्रांवर विक्री केल्याचा अजून एक फायदा शेतकऱ्याला होईल की या पुढच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून जे अनुदान देण्यासंदर्भातला आमचा जो आग्रह आहे.ते अनुदान या बाजार समितीच्या मान्यता असलेली जी केंद्र आहेत म्हणजेच विकास सहकारी संस्था या केंद्रांच्या माध्यमातून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या योजनेचा सुद्धा फायदा होणार आहे आणि त्यामुळे मग ते आत्ता तरी दहा रुपये अनुदान आपण प्रति किलो मागतो आहोत परंतु जे काही अनुदान शासन मान्य करेल ते अनुदान आपल्याला या केंद्रांवर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल असा विश्वास अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!