वेंगुर्ला येथे 14 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

वेंगुर्ला येथे 14 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला येथे 14 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती आणि रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय वेंगुर्ला, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संंयुक्त विद्यमाने शनिवार दि.14 मार्च रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ.विशाखा पाटील, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.योगेश नवांगुळ, जनरल सर्जन फिजिशियन डॉ.संजय केसरे, एम.बी.बी.एस. डॉ.प्रशांत कोलते, स्त्रीरोग व प्रसुतीतज्ज्ञ डॉ.समाधान मुळे, नेत्रतज्ज्ञ डॉ.गिडीयोन बॉस्को, स्तन कर्करोग तज्ज्ञ डॉ.प्रियांका देशभ्रतार, दंत तज्ज्ञ डॉ.अभिरामी राजेश व डॉ.विष्णू बाबू, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.सुयश बाबर, बालरोग तज्ज्ञ डॉ.रक्षा तवरावाला, फिजिशियन विभागाचे डॉ.निखिल राजेश, रक्तदाब तपासणी विभागाचे डॉ.सुनिधी सावंत आदी रूग्ण तपासणी करणार आहेत. तसेच सर्व प्रकारची रक्त तपासणी, हिमोग्लोबिन, कॅल्शियम, थायरॉईड, कॅन्सर तपासणी आणि मधुमेह रूग्णांसाठी तीन महिन्यांची साखर लेव्हल तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार मोफत औषधेही दिली जातील. विशेष म्हणजे या शिबिरात आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा फुले जनआरोग्य कार्ड आणि आयुष्यमान वय वंदना योजनेचे कार्ड काढून दिले जाणार आहे. रूग्णांनी येताना रेशनकार्ड, आधारकार्ड, ओटीपीसाठी मोबाईल
आणि उपचार सुरू असलेल्या औषधांचा कागद तसेच जुने रिपोर्ट घेऊन येणे. आरोग्य शिबिराच्या अधिक माहितीसाठी 9049316800, 9860699423, 9423216217 या नंबरवर संंपर्क साधावा.
तरी जास्तीत जास्त रूग्णांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!