राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्काराने अंकुश जाधव सन्मानित

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्काराने अंकुश जाधव सन्मानित

*कोंकण एक्सप्रेस*

*राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्काराने अंकुश जाधव सन्मानित*

*कणकवली ः संजना हळदिवे*

दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश विष्णू जाधव यांना ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार – २०२६” अंतर्गत “राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखानीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

अंकुश जाधव यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजहितासाठी सातत्याने कार्य केले आहे. विविध स्तरांवर लोकांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

समाजामध्ये सकारात्प्क बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक राज्यस्तरावर होत आहे. समाजासाठी नवचैतन्य निर्माण करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी असून याच कार्याची दखल घेत ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पुरस्कारामुळे दोडामार्ग तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकुश विष्णू जाधव

विशेष

पुरस्कार :

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्ररत्न पुरस्कार – २०२६

संस्था :

ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

पुरस्कारार्थी : अंकुश विष्णू जाधव

गाव :

झरेबांबर, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग

क्षेत्र :

सामाजिक कार्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!