आंबा, काजू बागायतदारांना वेंगुल्र्यातून पाठींबा*

आंबा, काजू बागायतदारांना वेंगुल्र्यातून पाठींबा*

*कोंकण एक्सप्रेस*

*आंबा, काजू बागायतदारांना वेंगुल्र्यातून पाठींबा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

आंबा, काजू बागायतदार आणि व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या भव्य मोर्चाला वेंगुर्ला शहरातून पाठींबा देण्यात आला. दरम्यान, वेंगुल्र्यातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद ठेवली. तर अत्यावश्यक सेवांसहीत काही फळे, फुले तसेच पालेभाजी यांची दुकाने सुरू होती.
हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीडा – रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरातील मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. या पार्·ाभूमीवर शेतकरी व व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गुरूवारी वेंगुर्ला शहरातील व्यापा-यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन या आंबा, काजू बागायतदारांच्या या मोर्चाला पाठींबा दर्शविला.
फोटोओळी – आंबा, काजू बागायतदारांच्या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी वेंगुल्र्यातील व्यापा-यांनी आपापली दुकाने बंद ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!