यशवंतराव भोसले तंत्रनिकेतनतर्फे १ मार्चला मोफत ‘एमएचटी-सीईटी’ मार्गदर्शन कार्यशाळा…

यशवंतराव भोसले तंत्रनिकेतनतर्फे १ मार्चला मोफत ‘एमएचटी-सीईटी’ मार्गदर्शन कार्यशाळा…

*कोंकण एक्सप्रेस*

*यशवंतराव भोसले तंत्रनिकेतनतर्फे १ मार्चला मोफत ‘एमएचटी-सीईटी’ मार्गदर्शन कार्यशाळा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२६ मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा महेश ट्युटोरियल्स, मुंबई व एसकेई कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने १ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भोसले नॉलेज सिटी येथील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडणार आहे.

या कार्यशाळेत शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ. संतोष शर्मा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच गणित विषयासाठी प्रा. राहुल घाडगे, रसायनशास्त्रासाठी प्रा. दीपक आमुंदकर आणि भौतिकशास्त्रासाठी प्रा. सचिन कदम हे विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची सखोल तयारी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिकेचा कल समजून घेणे तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी आवश्यक रणनीती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. सावंतवाडी बसस्थानका जवळून महाविद्यालयापर्यंत संस्थेतर्फे बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २७ फेब्रुवारी पूर्वी ७४४७६०५७९१, ९४०४१७३४०४ या क्रमांकांवर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!