शिवसेनेकडून कणकवली शहर लसीकरणासाठी मोफत रिक्षा व्यवस्था

शिवसेनेकडून कणकवली शहर लसीकरणासाठी मोफत रिक्षा व्यवस्था

*कोकण  Express*

*शिवसेनेकडून कणकवली शहर लसीकरणासाठी मोफत रिक्षा व्यवस्था…..*

 *कणकवली/प्रतिनिधी:* 

कणकवली शहरातील सतराही प्रभागातील कोव्हीड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या शहरवासीयांना व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी रिक्षेची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडून उपलब्ध करून देण्यात येणात आली आहे.त्याचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह सर्वच पदाधिकारी मेहनत करत नियोजन करत आहे.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा मंत्र शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे. हाच मंत्र कणकवली शहर शिवसेनेने कोव्हीडच्या कठीण काळात अंमलात आणण्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी सकाळी लस उपलब्ध झाल्यानंतर कणकवली शहरातील सर्वच प्रभागातील कोव्हीड लसीकरणासाठी शासन नियमानुसार पात्र असलेल्या शहरवासीयांना व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी रिक्षेची मोफत सुविधा शहर शिवसेनेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सलग पाच दिवस कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने सतरा प्रभागांमध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रभागनिहाय प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यावर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या शहरातील लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासून लसीकरण सेंटरपर्यंत रिक्षेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्या नागरिकाला पुन्हा घरापर्यंत रिक्षेद्वारे सोडण्याची व्यवस्था ही शिवसेनेकडून होणार आहे.दुपार पर्यंत सुमारे १०० जणांचे रजिस्टेशन करून झाले होते व आणखीही शहरातील नागरिक या सुविधेचा लाभ घेत होते अशी माहिती शिवसेनेचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांनी लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे रजिस्ट्रेशन करताना दिली यावेळी बाबू जाधव, रूपेश साळूखे, संतोष राणे ,समीर सावंत,उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!