ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सौं. वृषाली गवस यांचा प्रचार शुभारंभ

ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सौं. वृषाली गवस यांचा प्रचार शुभारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने सौं. वृषाली गवस यांचा प्रचार शुभारंभ*

*दोडामार्ग: शुभम गवस*

झरेबांबर पंचायत समिती निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सौं. वृषाली गवस यांनी आपल्या प्रचाराला वेग दिला आहे. आपल्या उसप गावातील ग्रामदेवतेच्या चरणी लीन होत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. परंपरेचे जतन करत ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी विजयासाठी आशीर्वाद घेतला.
सौं. वृषाली गवस या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संपर्क साधत असून घराघरांत भेटीगाठी घेऊन आपल्या भूमिका आणि विकासाचे नियोजन मांडत आहेत. त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्थानिक प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या झरेबांबर पंचायत समिती मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढत असून सौं. वृषाली गवस यांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!