*कोंकण एक्सप्रेस*
*कोनाळ मतदार संघात समिकरणे बदलण्याची चिन्हे..!*
*दोडामार्ग: शुभम गवस*
कोनाळ मतदार संघात सध्या सर्व राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपक्ष उमेदवार सौं. साक्षी संदिप देसाई यांना महिलांच्या स्त्रीशक्तीचा मोठा पाठिंबा मिळत असून त्याचबरोबर युवा वर्गाकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
या वाढत्या पाठिंब्यामुळे मतदारसंघातील जनसमुदायाचा कौल अपक्ष उमेदवार सौं. देसाई यांच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा सर्वत्र होत असून, येणाऱ्या निवडणुकीत त्या प्रभावी लढत देणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

