कोनाळ मतदार संघात एकच नाव – साक्षी “ताई” देसाई..!

कोनाळ मतदार संघात एकच नाव – साक्षी “ताई” देसाई..!

*कोंकण एक्सप्रेस*

*कोनाळ मतदार संघात एकच नाव – साक्षी “ताई” देसाई..!*

*दोडामार्ग : शुभम गवस*

कोनाळ मतदार संघात सध्या अपक्ष उमेदवार सौ. साक्षी संदिप देसाई यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. दिवसेंदिवस त्यांच्या प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद वाढताना दिसत असून, सर्वसामान्य मतदारांचा वाढता पाठिंबा हा चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरून एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळवणे ही बाब विशेष लक्षवेधी ठरत आहे. गावागावांत आणि घराघरांत सुरू असलेल्या त्यांच्या प्रचार मोहिमेला महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
साक्षी देसाई यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आणि लोकांशी असलेल्या जवळिकीचीच ही पावती असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे कोनाळ मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!