*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला राष्ट्रवादीतर्फे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर यांच्या तुळस येथील संपर्क कार्यालयात घेण्यात आला.
प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा सचिव सुशिल चमणकर, तालुकाध्यक्ष संदिप पेडणेकर, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, युवा तालुकाध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, प्रविण परब, विष्णू पेडणेकर आदी उपस्थित होते. या सर्वांनीच अजितदादा पवार यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.

