माजी सरपंच स्नेहा गवस मैदानात..जनसंपर्काचे बळ..!

माजी सरपंच स्नेहा गवस मैदानात..जनसंपर्काचे बळ..!

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी सरपंच स्नेहा गवस मैदानात..जनसंपर्काचे बळ ..!*

*दोडामार्ग. : शुभम गवस*

शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवार श्रीमती स्नेहा संजय गवस यांनी आपल्या प्रचाराची झंझावाती सुरुवात केली आहे. झरेबांबर परिसरात माजी सरपंच म्हणून कार्यरत असलेल्या स्नेहा गवस यांनी आपल्या कार्यकाळात तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क ठेवत विविध विकासकामांना चालना दिली आहे.
गावागावांतून, वाडीवस्तीवरून त्यांचा प्रचार दौरा सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची जाण आणि सातत्याने केलेला जनसंपर्क हेच त्यांच्या प्रचाराचे मुख्य बळ ठरत आहे. महिलांच्या प्रश्नांसह पाणी, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी त्यांनी पूर्वी केलेल्या कामांची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांच्या उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, अनुभव, विश्वासार्हता आणि तळागाळातील घट्ट नातेसंबंध यांच्या जोरावर त्या मतदारसंघात मजबूत उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात निर्माण झालेला उत्साह पाहता झरंबांबर मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!