*कोंकण एक्सप्रेस*
*अणसूर पाल हायस्कूलचा वनिकरण विभागातर्फे सन्मान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य सामाजिक वनिकरण विभाग,सिंधुदुर्ग अंतर्गत हरितसेनेचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्ह्रातील 25 शाळांचा सिंधुदुर्ग सामाजिक वनिकरणचे विभागीय वनअधिकारी राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यात वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर-पाल हायस्कूलचा समावेश आहे.
अणसूर पाल हायस्कूलचे हरित सेना व इको क्लब अध्यक्ष पल्लवी गावडे व विद्यार्थी मंडळ यांनी मार्गदर्शक विजय ठाकर व संचिता परब यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वनस्पती बाग जतन व संवर्धन, परसबाग निर्मिती, एक पेड माँ के नाम 2.0, वृक्षलागवड, विविध प्राणी-पक्षी, वनस्पती व किटक – वनसंपदा माहितीपटाद्वारा प्रबोधन जागृती, पक्षी जगत रांगोळी प्रदर्शन आदी उपक्रम घेण्यात आले होते. या उत्कृष्ट उपक्रमांची दखल घेऊन सिंधुदुर्ग सामाजिक वनिकरणचे विभागीय वनअधिकारी राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते अणसूर पाल हायस्कूलला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मान मुख्याध्यापक राजेश घाटवळ व इको क्लब मार्गदर्शक विजय ठाकर यांनी स्विकारला. यावेळी सहाय्याक वनक्षेत्रपाल वर्षा कोळेकर, वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण वेंगुल्र्याचे लक्ष्मण पोतदार, वेंगुर्ला वनपाल दिप्ती मोर्ये, वनसंरक्षक ऋतुजा कदम व प्रमोद कदम आदी उपस्थित होते.

