चाफेड प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 27 जानेवारीला

चाफेड प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 27 जानेवारीला

*कोंकण एक्सप्रेस*

*चाफेड प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा 27 जानेवारीला*

*शिरगांव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा चाफेड नं. 1 या प्रशालेचा 2025 – 26 चा वार्षिक व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा देवगड तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मिलिंद साटम, शिक्षण प्रेमी किशोर लाड, सुभाष खरात, भाजपचे युवा मोर्चाचे देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम, चाफेड सरपंच महेश राणे, चाफेड गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, चाफेड ग्राम विकस अधिकारी प्रथमेश देशमुख, हनुमंत तेरसे, माजी मुख्याध्यापिका सौ. गौरी नारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 वाजता विद्यार्थ्यांचे नृत्य, नाटिका सादरीकरण आदी गुणदर्शन पर कार्यक्रम तसेच रात्रौ. 10 वाजता दशावतारी नाटक आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक विकास वाडीकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव गावकर, उपाध्यक्ष उदय राणे, शिक्षक प्रकाश पवार, शालेय मुख्यमंत्री गौरांग राणे, सर्व पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ याने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!