वरवडे गावाचा क्रिकेटचा महासंग्राम! ‘वरवडे प्रिमीयर लीग २०२६’ (VPL पर्व ५) चा दिमाखदार सोहळा संपन्न

वरवडे गावाचा क्रिकेटचा महासंग्राम! ‘वरवडे प्रिमीयर लीग २०२६’ (VPL पर्व ५) चा दिमाखदार सोहळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*वरवडे गावाचा क्रिकेटचा महासंग्राम! ‘वरवडे प्रिमीयर लीग २०२६’ (VPL पर्व ५) चा दिमाखदार सोहळा संपन्न!*

*कणकवली (वरवडे ) ः संजना हळदिवे*

ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ वरवडे (रजि. नं. सिंधुदुर्ग ००००२४४/२५) यांच्या वतीने आयोजित, सर्वांच्या पसंतीस उतरलेली वरवडे प्रिमीयर लीग २०२६ (VPL पर्व ५) या तीन दिवसीय भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
​दिमाखदार उद्घाटन सोहळा
​या स्पर्धेचे शानदार उद्घाटन श्री. संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वरवडे गावातील क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात या खेळाच्या कुंभाचा नारळ फुटला.
​भरघोस बक्षिसांची लयलूट
​यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम पारितोषिक रु. २५,००१ व आकर्षक चषक असून, हे पारितोषिक श्री. संतोष चव्हाण यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त इतर बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:
​द्वितीय पारितोषिक: रु. २०,००१ व आकर्षक चषक
​मालिकावीर: सायकल आणि आकर्षक चषक
​वैयक्तिक पुरस्कार: उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि ‘उगवता तारा’ यांना प्रत्येकी रु. २,००० व चषक.
​विशेष आकर्षण: ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि अंतिम सामनावीर (रु. १,०००) पुरस्कार.
​ महत्त्वाचे कार्यक्रम
​स्पर्धेचा कालावधी: २४, २५ व २६ जानेवारी २०२६
​बक्षीस वितरण: सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता.
​वरवडे गावच्या या ‘अद्भुत सोहळ्यास’ आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. क्रिकेटचा हा थरार अनुभवायला विसरू नका!
​आयोजक:
वरवडे प्रीमियर लीग व्यवस्थापन समिती
​श्री. संतोष (पपु) पुजारे (अध्यक्ष)
​श्री. निलेश सादये (उपाध्यक्ष)
​श्री. विनायक घाडीगांवकर (खजिनदार)
​श्री. निलेश सावंत (सचिव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!