सिंधुदुर्गात भाजपचा वारू रोखले जाईना ; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ९ जागांवर ‘कमळ’ बिनविरोध

सिंधुदुर्गात भाजपचा वारू रोखले जाईना ; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ९ जागांवर ‘कमळ’ बिनविरोध

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात भाजपचा वारू रोखले जाईना ; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ११ जागांवर ‘कमळ’ बिनविरोध!*

*सिंधुदुर्ग : संजना हळदिवे*

जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांवर मात करत तब्बल ११ जागांवर बिनविरोध विजय मिळवून जिल्ह्यात मोठे राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या ६ जागांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद: भाजपची एकहाती सरशी
जिल्हा परिषदेच्या ५ जागांवर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे ‘जाणवली’ मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्तीने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे.
• खारेपाटण: प्राची इस्वालकर (भाजप)
• बांदा: प्रमोद कामत (भाजप)
• जाणवली: रुहिता राजेश तांबे (भाजप कार्यकर्ती – शिवसेना उमेदवार)
• पडेल: सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
• बापर्डे: अवनी अमोल तेली (भाजप)
पंचायत समिती: कणकवली आणि देवगडमध्ये ‘क्लीन स्वीप’
पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारांसमोर विरोधकांनी माघार घेतल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत.
कणकवली पंचायत समिती:
• वरवडे: सोनू सावंत (भाजप)
देवगड पंचायत समिती:
• पडेल: अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
• नाडण: गणेश सदाशिव राणे (भाजप)
• बापर्डे: संजना संजय लाड (भाजप)

• बिडवाडी : संजना राणे  (भाजप)

• कोकीसरे : साधना नकाशे  (भाजप)

सिंधुदुर्गात नारायण राणे आणि महायुतीच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेली ही कामगिरी विरोधकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे. निवडणुकीपूर्वीच इतक्या जागा बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उर्वरित जागांवरही याचा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!