*कोंकण एक्सप्रेस*
*इन्सुली चेक नाक्यावर खासगी वहानानची श्वान पथकाकडून तपासणी*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
बांदा- सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळी तसेच लगतच्या गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात देशी/विदेशी पर्यटक येत असुन पर्यटन स्थळांवर कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ (ड्रग्स) सारखे पदार्थांचा वापर होणार नाही याकरिता
आज दिनांक-22.01.2026 रोजी मा .पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री.मोहन दहिकर ,अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम,उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र पालवे सहा पोलीस निरीक्षक बांदा यांच्या उपस्थितीत बांदा पोलीस ठाणे,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग,BDDS सिंधुदुर्ग यांच्या उपस्थितीत इन्सुली पोलीस चेक पोस्ट येथे श्वान पथकाच्या मदतीने लघ्जरी बस तसेच इतर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

