*कोंकण एक्सप्रेस*
*असलदे उगवतीवाडी येथे गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम*
*कणकवली : प्रतिनिधी*
श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सुरुवात सकाळी ९:३० वाजता श्री गणेश पुजा , सकाळी १०:३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, ११:३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद , सायंकाळी ३ ते ५ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ , ५ ते ७ लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ८ ते १० वाजता स्थानिक भजने, रात्रौ १० वाजता श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी तालुका देवगड बुवा संतोष जोईल विरुद्ध श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडील बुवा व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सेवा मंडळ असलदे उगवतीवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

