पिकुळे (मधलीवाडी) येथे गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा होणार

पिकुळे (मधलीवाडी) येथे गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा होणार

*कोंकण एक्सप्रेस*

*पिकुळे (मधलीवाडी) येथे गुरुवारी श्री गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा होणार*

*दोडामार्ग : शुभम गवस*

पिकुळे (मधलीवाडी) येथील श्री गणेश मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी श्री गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात सकाळी काकड आरतीने होणार असून सकाळी व्यासपीठ बांधकामाचे भूमिपूजन, अभिषेक व श्री गणेश पूजा तसेच श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी सत्यनारायण आरतीनंतर भाविकांना तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ दिला जाणार आहे.
सायंकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून भजन कार्यक्रम होणार असून रात्री श्री ओंकार नटेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, कुडाळ यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या नाट्यप्रयोगासाठी नवे वर्ष, नवा संच व दमदार कलाकारांची मांडणी करण्यात आली आहे.
हा संपूर्ण उत्सव गणेश मंदिर न्यास व समस्त ग्रामस्थ, पिकुळे (मधलीवाडी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन व कृपाशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!