एसटी कर्मचारी संघाच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी प्रसन्ना देसाई

एसटी कर्मचारी संघाच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी प्रसन्ना देसाई

*कोंकण एक्प्रेस*

*एसटी कर्मचारी संघाच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी प्रसन्ना देसाई*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

भाजपप्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार 2026च्या कार्यकारिणीची सभा भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला भाजपा कार्यालयात झाली. या सभेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांची आगार अध्यक्षपदी फेरनिवड, तर आगार कार्याध्यक्षपदी भाजप वेंगुल्र्याचे तालुकाध्यक्ष पपू परब यांची निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीमध्ये आगर सचिवपदी महादेव भगत, उपाध्यक्षपदी विजय कोरे व मकरंद होळकर, सहसचिवपदी वैभव मांजरेकर, महिला सचिवपदी सेजल रजपूत व सिद्धी परब, संघटक सचिवपदी रोहन नांदोस्कर व रूपेश तेंडुलकर यांचा समावेश आहे. यावेळी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, विभागीय पदाधिकारी रोशन तेंडुलकर, संजय सावंत, प्रशांत गावडे, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगाराचे सभासद दाजी तळवणेकर, सखाराम सावळ, मिलिंद मयेकर, मनोहर वालावलकर, निखिल भाटकर, अक्षय येसाजी, अनंत झोरे, प्रकाश मोहिते, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, आशिष वराडकर, तेजस जोशी व इतर कर्मचारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!