*कोंकण एक्सप्रेस*
*बांदा कास नं. १ शाळेचा Elementary Examination मध्ये १००% निकाल*
*बांदा / शुभम गवस*
बांदा येथील कास नं. १ शाळेने Elementary Examination मध्ये शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या घवघवीत यशामुळे शाळा परिसरात समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परीक्षेत शाळेच्या गौरी गावडे, मुग्धा पेडणेकर, शमिका गवंडी, श्रावणी पंडीत, श्रेया मेस्त्री व विनया पवार या विद्यार्थिनींनी विशेष यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण होत शाळेचा निकाल १००% लागला आहे.
विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन तसेच पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकवर्ग आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

