*कोंकण एक्सप्रेस*
*सर्व सभासदांनी वज्रमूठ घट्ट करा-जिल्हाध्यक्ष अणावकर*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
नियमांच्या आधारे लढणारा मी योद्धा आहे. संघटनेची ताकद ही माझी शक्ती आहे. कोणत्याही कार्यालयात जाऊन सभासदांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न संघशक्तीमुळेच शक्य होतो. म्हणूनच सर्व सभासदांनी वज्रमूठ घट्ट करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी वेंगुर्ला येथील आनंद मेळाव्यात केले.
सिंधुदुर्ग सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन वेंगुर्ला तालुका शाखेचा आनंद मेळावा नुकताच साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. याचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर, उपाध्यक्ष ना.य.सावंत, भरत आवळे, जिल्हा सल्लागार सुधाकर खानोलकर, जिल्हा प्रतिनिधी श्रीमती मुणनकर, श्री.भालेकर, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, जिल्हा प्रतिनिधी किशोर नरसुले, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष झिलू गोसावी, सचिव विठ्ठल कदम, माजी अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर, माजी सचिव राजेंद्र बेहरे, सल्लागार सत्यवान पेडणेकर आदी उपस्थित होते.
ना.य.सावंत यांनी दरमहाचे निवृत्तीवेतन एक तारीखलाच मिळावे. याचा पुनरोच्चार केला. कणकवली तालुकाध्यक्षांनी जिल्ह्रात अनेक राज्य संघटना सभासद करत आहेत. ते तालुकस्तरावरील प्रश्न कसे काय सोडवणार, असा प्रश्न उपस्थित केला. झिलू गोसावी यांनी वेंगुर्ला तालुक्याने केलेल्या कामांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात 75 वर्षे पूर्ण व त्यापुढील असलेल्या विजय गवंडे, दत्ताराम सावंत, वर्षा खोत, शिल्पा नेरूरकर, रमेश पिंगुळकर, अलका खानोलकर, वसंत गोसावी या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. रमेश पिंगुळकर पाच हजारांची, शिल्पा नेरूरकर यांनी एक हजारांची, रामजी राधाकृष्ण वेतोरकर यांच्या स्मरणार्थ राधाकृष्ण वेतोरकर यांनी 2 हजार 500 रूपयांची देणगी संघटनेला दिली. अहवाल वाचन सचिव विठ्ठल कदम यांनी केले. सूत्रसंचालन कैवल्य पवार यांनी तर आभार सुधीर कांबळी यांनी मानले.
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी किशोर नरसुले, आबा खोत, राजेंद्र बेहेरे, विजय सावंत, चित्रा खानोलकर, सुधीर कांबळी, भरत आवळे, सत्यवान पेडणेकर, झिलू गोसावी, दिलीप खानोलकर यांनी परिश्रम घेतले.

