*कोंकण एक्सप्रेस*
*शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा घवघवीत यश*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेसाठी 16 विद्यार्थी बसले होते .ही परीक्षा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेत इंटरमिजिएट मध्ये ‘ब’ श्रेणीमध्ये जान्हवी प्रदीप दळवी ,अनुश्री विराज डोंगरे,प्रीती तुकाराम खानविलकर ,’क ‘श्रेणीमध्ये तपस्या महेश दळवी, मृणाल विठ्ठल लाड ,जागृती नरेश मेस्त्री ,तनिष्का तुकाराम परब, रिया नारायण राणे ,सिद्धेश सूर्यकांत चव्हाण, मेहुल गजानन दळवी,आयुष भिकाजी घाडी, आर्यन अजय मडव ,जयदीप विनोद रासम, जयेश दाजी रासम ,सुजित सुहास रासम पास झाले आहेत. व एलिमेंटरी या परीक्षेत 13 विद्यार्थी बसले होते ‘अ’ श्रेणीमध्ये समर्थ सचिन रासम, ‘ब’ श्रेणीमध्ये भक्ती बाळकृष्ण तेली ,हर्षदा सुभाष खानविलकर ,करिष्मा विलास खानविलकर ,ललित बाळकृष्ण हरकुळकर ,सानिका गजानन दळवी वेदिका जयगणेश परब ,तसेच ‘क’श्रेणीमध्ये आरोही अशोक सावंत ‘अनन्या भिकाजी रासम ‘कुशल दिगंबर तेली ‘मोहन मनोज परब ‘नेहा भिकाजी रासम, पूजा प्रदीप परब, यश संतोष रासम या ग्रेडनुसार सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर अनंत यादव यांनी मार्गदर्शन केले .तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री .विठ्ठल शिवाजी रासम सचिव ॲड.श्री .प्रभाकर काशिराम वालावलकर व सभासद तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री .आशुतोष अंकुश रासम व सदस्य श्री .अशोक दाजी रासम ,श्री. सुभाष शिवाजी रासम ,श्री. संतोष बापूराव कदम ,श्री. समीर गणपत सावंत श्री .अनिल रघुनाथ सावंत मुख्याध्यापक ,पालक , शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

