*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपकडून बंडू हर्णे तर शहर विकास आघाडी कडून बाळू पारकर स्वीकृत नगरसेवक*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अखेर भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे नाव निश्चित झाले आहे. तर शहरीकाचा आघाडी कडून शिवसेना शहराध्यक्ष असलेल्या सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचे नाव स्वीकृत नगरसेवकपदी निश्चित झाल्याचे समजते.
कणकवली नगरपंचायत च्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या 13 जानेवारी रोजी होणार असून शहर विकास आघाडीचे 8 आणि भाजपाचे 9 अधिकृत नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहे
त्यामुळे आता येत्या काळात कणकवली शहरात सत्ताधारी शहर विकास आघाडीला टक्कर देण्याकरिता बंडू हर्णे हे नगरपंचायत च्या रिंगणात स्वीकृत नगरसेवक म्हणून उतरणार . व यातून सत्ताधारी व हर्णे यांच्यात राजकीय जुगलबंदी देखील पाहायला मिळणार.

