*कोंकण एक्सप्रेस*
*रिस्टर नाथ पै यांचा 55 वा स्मृतिदिन, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रसेवादल यांच्यावतीने गोपुरी आश्रम येथे साजरा होणार*
* # आपल्या_धडावर _आपलेच _डोके …आनंद शितोळे*
*कणकवली : प्रतिनिधी*
गेले कित्येक वर्षे फेसबुकसारखया समाज माध्यमांवरून सत्ताधाऱ्यांच्या घटनांबाह्य कारभारावर मोजक्या शब्दांत अचूक टिका करणारे .. आनंद
धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा बट्ट्याबोळ करू पाहाणारे मनुवाद पुरस्कर्ते, आजचे राज्यकर्ते ह्यांच्यावर न घाबरता लोकशाही मार्गाने शब्दांचे आसुड ओढणारे …आनंदराव
आपणही त्यांचे फेसबुक वरील अनेक छोटे परंतु मार्मिक लेख वाचत स्वतःला जागरूक ठेवत आलोय … ते आनंदराव शितोळे
ज्यांनी आपल्याला आपल्या धडावरील डोके शाबूत ठेवण्याची
टाचणी सतत टोचती ठेवली ते ..आनंद शितोळे
“ बॅ. नाथ पै स्मृती-५५ “ ह्यांच्या पुण्यतिथी निमित्त *कमलताई परुळेकरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला
रविवार, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता ..आनंद शितोळे
गोपुरी आश्रम
कणकवली- वागदे येथे आपल्याशी गप्पा सदृश्य विचारांची झणझणीत ठेचा-भाकरी घेऊन येत आहेत.
संस्थेने ह्या निमित्ताने आनंद शितोळे यांना आमंत्रित केले आहे. विषय जल-जंगल-जमीन- काल-आज-उद्या
आपण लोकशाही उपासक, घटना रक्षक ,धर्मनिरपेक्षता मानणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे सृजनशील सजग नागरिक आहोत… हो ना ..?
मग हा कार्यक्रम चुकवू नका.
आनंदाने या-
जाताना आपले डोके आपल्याच धडावार आहे ना, याची खात्री करून जा..!!
विसरू नका-
१८ जानेवारी सकाळी ११.०० वाजता
-निमंत्रक
राष्ट्र सेवा दल, सिंधुदुर्ग

