*कोंकण एक्सप्रेस*
*कनेडी दशक्रोशीत संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होणार संयुक्त जयंती उत्सव*
*महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन*
*कणकवली : प्रतिनिधी*
मानवता आणि समानता तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रसंत आणि महामानवांची संयुक्त जयंती कनेडी दशक्रोशीत साजरी करण्याचा निर्णय चर्मकार आणि बौद्ध समाजबांधवांच्या वतीने घेण्यात आला आहे. कनेडी दशक्रोशीतील महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून
समितीच्या अध्यक्ष पदी श्री.अशोक कांबळे व कार्याध्यक्ष पदी श्री.संजय उर्फ छोटू कदम, सचिवपदी आनंद जाधव, खजिनदारपदी नामदेव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कनेडी दशक्रोशीतील चर्मकार समाज व बौद्ध समाजाची संयुक्त सभा सांगवे ग्रा.प.च्या सभागृहात रविवार दि.११ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सभेत संत शिरोमणी रोहिदास महाराज.छत्रपती शिवाजी महाराज.व
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती कनेडी दशक्रोशीतील सर्व चर्मकार व बौद्ध समाज बांधवानी एकत्र येऊन साजरी करण्याचे ठरविण्यात आले. या वेळी महामानव संयुक्त महोत्सव समिती नेमण्यात आली समितीच्या अध्यक्ष पदी श्री.अशोक कांबळे.कार्याध्यक्ष पदी श्री.संजय उर्फ छोटू कदम.सचिव पदी.श्री.आनंद जाधव खजिनदार पदी श्री.नामदेव जाधव.उपाध्यक्ष श्री.श्रीधर तांबे.सल्लागार पदी श्री.शंकर जाधव,श्री.प्रदीप कांबळे.श्री.अर्जुन कांबळे.श्री.भाग्योदय कांबळे,श्री.संतोष जाधव.श्री.संदीप तांबे,डॉ.अशोक कदम.श्री.चंद्ररत्न कांबळे
सहसचिव पदी श्री.महेंद्र कदम व श्री.संजय तांबे.
संघटक पदी श्री.सागर चव्हाण श्री.सुंदर जाधव.श्री.संकेत कांबळे व श्री.अर्जुन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली,या वेळी चर्मकार व बौद्ध समाजातील बांधव उपस्थित होते.

