साळशी–सरमळेवाडी शाळेचे शिक्षक समाधान कोळी यांची आशयज्ञान स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड*

साळशी–सरमळेवाडी शाळेचे शिक्षक समाधान कोळी यांची आशयज्ञान स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड*

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी–सरमळेवाडी शाळेचे शिक्षक समाधान कोळी यांची आशयज्ञान स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन शिक्षकांची निवड*

*शिरगाव / संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील जि. प. साळशी–सरमळेवाडी शाळेचे मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा मुख्याध्यापक समाधान मंगलाबाई रमेश कोळी यांनी आशयज्ञान स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
नोव्हेंबर महिन्यात शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय आशयज्ञान स्पर्धेत समाधान कोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. या यशामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विभागीयस्तरीय आशयज्ञान स्पर्धेत त्यांनी पाचवा क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
ही स्पर्धा शिक्षकांसाठी असून, शिक्षकांचे विषयज्ञान, अध्यापन कौशल्य, शिक्षणशास्त्रावरील प्रभुत्व तसेच शैक्षणिक क्षेत्रातील चालू घडामोडींचे आकलन तपासण्यासाठी घेतली जाते. त्यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक गुणवत्तावृद्धीसाठी या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे.
ही विभागीय स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांतील तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षकांसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेत समाधान कोळी यांनी मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केवळ दोन शिक्षकांची निवड झाली असून, त्यामध्ये समाधान कोळी यांचा समावेश आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक संघ, ग्रामस्थ, पालक व हितचिंतकां नी समाधान कोळी यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!