हत्ती उपद्रवावर ठोस निर्णय न झाल्यास २६ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन – प्रविण गवस

हत्ती उपद्रवावर ठोस निर्णय न झाल्यास २६ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन – प्रविण गवस

*कोंकण एक्सप्रेस*

*हत्ती उपद्रवावर ठोस निर्णय न झाल्यास २६ जानेवारीनंतर तीव्र आंदोलन – प्रविण गवस*
.
*दोडामार्ग : शुभम गवस*

हत्तींच्या वाढत्या उपद्रवाविरोधात ५ जानेवारीपासून दोडामार्ग वन क्षेत्रपाल कार्यालयात सुरू असलेला ठिय्या आंदोलन सामाजिक कार्यकर्ते प्रविण गवस यांनी तूर्तास मागे घेतला आहे. मात्र, हत्ती हटाव व हत्ती पकड याबाबत ठोस व परिणामकारक निर्णय न झाल्यास २६ जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम देत पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हत्तींच्या सततच्या हालचालींमुळे नागरिकांचे जीवित, शेती व मालमत्तेला धोका निर्माण झाला असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवार, १३ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे मुख्य वनसंरक्षक यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक उपवनसंरक्षक वैभव बोराटे यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली. यावेळी दोडामार्ग वन परीक्षेत्रीय अधिकारी संभाजी पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी प्रविण गवस यांच्यासह संजय देसाई, दत्ताराम देसाई, लखू खरवत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
“५ जानेवारीपासूनच्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून आता केवळ चर्चा नव्हे तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
मंगळवारच्या बैठकीतून हत्ती प्रश्नावर ठोस, कायमस्वरूपी व जनतेला दिलासा देणारा निर्णय होतो का, याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!