*कोंकण एक्सप्रेस*
*मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन…*
*केसरकर यांच्या प्रयत्नाने ५ लाखांचा निधी; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मळगाव-रेडकरवाडी येथील झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या रस्त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम उर्फ नाना मांजरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला.
यावेळी मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर, शिवसेनेचे मळगाव उपविभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सचिन रेडकर, भाजपचे बुथ अध्यक्ष दीपक जोशी, दिवाकर खानोलकर, गोविंद मांजरेकर, प्रितम सातार्डेकर, विवेक पेडणेकर, विनय पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा रस्ता मंजूर झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले.

