पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते देवगडातील विकासकामांचे लोकार्पण.

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते देवगडातील विकासकामांचे लोकार्पण.

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते देवगडातील विकासकामांचे लोकार्पण…*

*देवगड ः प्रतिनिधी*

शहराच्या विकासाला अधिक वेग देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. नगरपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शहराच्या स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित कामांवर भर देण्यात आला आहे.

या विकासकामांमध्ये प्रामुख्याने पर्यटन स्थळांवर आधुनिक ई-टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शहरात भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, कचरा व्यवस्थापनासाठी नवीन वाहने आणि ट्रॅक्टर-ट्रॉली देखील दाखल झाल्या आहेत. यावेळी बोलताना श्री. राणे म्हणाले की, देवगड-जामसंडे शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि आदर्श बनवण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!