जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन*

*सिधुदर्ग नगरी*

कर्करोगाच्या निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅन्सर व्हॅन दाखल झालेली असून या अंतर्गत आज दि. ०७जानेवारी २६ रोजी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबीरात ९४ जनानी लाभ घेतला

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या हस्ते फीत कापून या शिबीराचे उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्जुन नरोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोहन साळुंखे तसेच जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे व सर्व आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

या वेळी कर्करोग तपासणी अंतर्गत मुखाचा, स्तनाचा तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाकरीता रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये एकूण ९४रुग्णांची तपासणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!