*कोंकण एक्सप्रेस*
*रानबांबुळी गावाचे नाव अस्तीवासाठी सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत मध्ये घेण्यास ग्रामसभेचा कडाडून विरोध*
*ग्रामसभेने एक मताने घेतला ठराव :विकसित झोन क्षेत्र ही वगळावे*
*सिधुदुर्गनगरी*
जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीचीच .संपादित झाली आहे त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता छत्रपतीं शिवाजी महाराजाच्या पदस्वशीने पूणीत ऐतिहासिक वारसा असलेला रानबांबुळी गावाचे नाव अबाधित ठेवावे,परबवाडी वाड्या वस्तीमधील भाग वगळून ,७७ हेक्टर क्षेत्रातील विकसीत झोन वगळून सिधुदुर्गनगरीनगरपंचायत करा, रानबाबुळी गावाचा नगरपंचायत मध्ये समावेश केल्यास आमचा गावाचा ठाम विरोध राहीलअसा ठराव रानबांबुळी ग्रामपंचायत ग्रामसभेने एकमताने घेतला आहे .
कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी गावची ग्रामसभा सरपंच परशुराम परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळीउपसरपंच अंजली कदम ग्रामसेवक धुरी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच वसंत बांबुळकर , काका परब ,अशोक परब ,प्रसाद गावडे, संजय लाड आदींसह गावातील दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी झालेल्या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली पाणी योजना रस्ते दिवाबत्ती वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय पेयजलअंतर्गत घेण्यात आलेली विकास कामे यासह विविध जनतेच्या विकासात्मक प्रश्नावर चर्चा करण्यात आली
त्यानंतर झालेल्या चर्चेत सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत ही ओरोस रांनबांबुळी या तीन गावांचा समावेश करून करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता जिल्हा मुख्यालयाच्या भूसंपादनात सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय साठी रानबांबूळी गावाची सर्वाधिक जमीन गेली आहे याशिवाय धरण कोकण रेल्वे प्रकल्प यामध्येही रानबांबुळी गावाची सर्वाधिक जमीन संपादित झाली आहे त्यामुळे नगरपंचायत करावयाची झाल्यास रानबांबुळी गाव वगळून नगरपंचायत करण्यास आमचा विरोध नाही गावातील या तीन प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या सर्वाधिक क्षेत्राचा विचार करता प्राधिकरण क्षेत्रात रस्त्यालगत परबवाडी मधील काही वस्ती मधील जमीन वगळण्यात यावी अशी ही आमची मागणी असून वाडी वस्ती या निकषाखाली सदरची क्षेत्र वगळावे रानबाबुळी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज यांच्यापदस्पर्शाने पुनीत झालेले गाव असून हे रानबाबुळी गाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहिल्यास गावाचे नाव अभावित राहील न पेक्षा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीमध्ये रानबाबुळी गावाचे नाव पुसून जाऊ शकते त्यामुळे रानबाबुळी गाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात घेण्यास आमचा पूर्ण गावाचा कडाडून विरोध आहे वेळ पडल्यास आम्ही आंदोलन करू असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे रानबांबुळी गावाच्या चारही सीमांवर रांनबांबुळी ग्रामपंचायत सहर्ष स्वागत आभार असे फलकही लावण्यात यावे अशी सूचना करताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत असली तरी विकास कामासाठी निधी येणार आणि नगरपंचायत मध्ये गाव समाविष्ट झाले तरी नगरोथान खाली निधी येणार परंतु प्रॉपर्टी कार्ड च्या आणि करवाढी च्या मुळे गावावर भुर्दंड बसणार आहे लोकांना ग्रामपंचायत मधून जसे ताबडतोब दाखले मिळतात तसे दाखले व अन्य कागदपत्रे मिळविताना हेलपाटे मारावे लागतील आज झालेल्या नगरपंचायत नगरपरिषदेमध्येही कचरा उचलला जातो आपल्या ग्रामपंचायती मधूनही कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी घेण्यात येईल प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी कुटुंबानी आपला कचरा आपल्या परिसरातच त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून गावाची स्वच्छता आपणच राखली पाहिजे रानबांबुळी नजीकचा गाव असला तरी गावासाठी शासनाच्या विविध विकास योजना निधीतून विकास कामे होणारच आहेत रानबांबुळी गावाचे अस्थित्व नष्ट करूनआम्हाला विकास नकोअसेही मत मांडण्यात आले
सिंधुदुर्ग नगरी जिल्हा मुख्यालय भूसंपादन प्रक्रियेनंतर वाढीव विकासक झोन या नावाखाली गेली अनेक वर्षे ७७ हेक्टर क्षेत्र राखीव दाखवले आहे हे क्षेत्र आमच्या गावाच्या क्षेत्रात दाखविले तरी त्यावरील विकसित पारंपारिक निवासी वापर झोन या पेन्सिल नोंदी रद्द कराव्यात आणि हे क्षेत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावे जिल्हा मुख्यालय संपादनच्या काळात संपादित झालेल्या क्षेत्रात व्यतिरिक्तही क्षेत्र विकसित झोन होतेत्यावेळी दोन रुपये किंवा शंभर रुपये या दराने या जमिनी घेतल्या होत्या त्या वगळाव्या याबाबत खासदार नारायण राणे यांच्याकडे हा प्रस्ताव दिला होता दरम्यान तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी त्यावेळी ६० हेक्टर क्षेत्र वगळण्याबाबतचा घेतलेल्या निर्णयामुळे आज धुरीवाडी सह काही वाड्यांचे क्षेत्र विकसित होऊ पाहत आहे त्यामुळे खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदन पण शुभेच्छा अभिनंदन बाबत ठरावही घ्यावा असे संजय लाड यांनी सुचित केले
सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत होत असताना नगरीच्या विकासासाठी घेतलेले हजारो हेक्टर क्षेत्रात आज विकास खुटला आहेधन दांडग्यांच्या घशामध्ये येथील जमिनी घातल्या जात आहेत प्राधिकरणाच्या नावाखाली असलेल्या क्षेत्राचा विकास निधी अभावी होत नाही आज होणारा विकास हा जमिनी विकून असलेल्या निधीच्या कराच्या माध्यमातून होत आहे मग अजून रांनबांबुळी गावातील विकसित झोनच्या नावाखाली जमीन कशासाठी ओरोस गावाने न्याया
लयात जाऊन ज्याप्रमाणे ७० हेक्टर क्षेत्र वगळून घेतले त्याप्रमाणे वेळ पडल्यास आम्हीसुद्धा न्यायालयात दाद मागण्याच्या विचाराधीन असल्याचेही यावेळी स्पष्ट केले

