शिवसेनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधा..

शिवसेनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधा..

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क साधा…*

*संजू परबः आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न..*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

दोडामार्ग तालुक्यातील कोलार, मणेरी व माटणे पंचायत समिती क्षेत्रात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख मा. श्री. संजू परब हे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात संघटन बळकटी, कार्यकर्त्यांची भूमिका तसेच निवडणूक तयारीबाबत सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेनेची ताकद तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत कविटकर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर व शैलेंद्र दळवी, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, विभाग संघटक विलास सावंत, कोलझर सरपंच सुजल गवस यांच्यासह गोपाळ गवस, श्रेयाली गवस तसेच सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेच्या संघटनात्मक तयारीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!