*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाटमध्ये उद्यापासून जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार*
*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन*
*फोंडाघाट (प्रतिनिधी)*
नववर्षाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी
मिळणार असून फोंडाघाटमध्ये उद्यापासून दोन दिवस जिल्हास्तरीय कबड्डीचा धरार पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने वरिष्ठ पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी सावंत पटेल कंपाऊंड, बिजलीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पंचक्रोशी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने घेण्यात येत आहे.
मागील ३०-३५ वर्ष फोंडाघाट मधील खेळाडूंनी कबड्डी खेळाचा वारसा जपलेला असून वर्षानुवर्षे या खेळामध्ये प्रगती करत असताना या विभागातून कित्येक खेळाडू राज्य पातळीपर्यंत चमकले आहेत. या विभागात शिवशाही क्रीडा मंडळ, पंचक्रोशी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तसेच अन्य मंडळाच्या माध्यमातून सातत्याने कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जात असते,
दरम्यान यावर्षी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने वरिष्ठ पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा घेण्याचे यजमानपद फोंडाघाट येथील पंचक्रोशी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांना मिळालेले असून उद्या संध्याकाळ पासून प्रकाश झोतात होणाऱ्या या वरिष्ठ पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून स्पर्धा ठिकाणी मैदानाच्या बाजूनं कब्बड्डी प्रेमिना बसण्यासाठी भव्य असे स्टेडियम उभरण्यात आले आहे. याठिकाणी बसून सर्व कबड्डी प्रेमींना जिल्हास्तरीय कबड्डीचा थरार अनुभवयास मिळणार आहे.
फोंडाघाट या ठिकाणी होणाऱ्या कबड्डीचा थरार अनुभवणे याची एक वेगळाच आनंद असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे उद्या सायंकाळी सहा वाजता आवर्जून या स्पर्धा ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रम होणार असून या स्पर्धेसाठी दोन्ही विभागात मिळून सुमारे 70 हजार ची रोख पारितोषिके असून आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. झालेल्या स्पर्धेमधूनच महिला पुरुष जिल्हास्तरीय संघ जाहीर करण्यात येईल या स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

