अणसूर पाल हायस्कूल येथे शनिवारी संगीत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

अणसूर पाल हायस्कूल येथे शनिवारी संगीत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

*कोंकण एक्सप्रेस*

*अणसूर पाल हायस्कूल येथे शनिवारी संगीत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

अणसूर पाल विकास मंडळ मुंबई व गुरूकूल संगीत शिक्षण संस्था संयुक्त विद्यमाने अणसूर पाल हायस्कूलमध्ये विद्याथ्र्यांसाठी भारतीय शास्त्रीय संगीत गायन व वादनाचे शास्त्रोक्त मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहे. याचे उद्घाटन शनिवारी दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात शाळेतील विद्याथ्र्यांना गुरूकूल संगीत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संगीत अलंकार दिप्तेश मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विशारद हर्षल मेस्त्री प्रशिक्षण देणार आहेत. याच्या उद्घाटनप्रसंगी अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देऊ गावडे आणि गुरूकूल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक आनंद माळकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन अणसूर पाल विकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष गोविंद गावडे, सचिव लिलाधर गावडे, मुख्याध्यापक राजेश घाटवळ आणि गुरूकूल संगीत शिक्षण संस्थेच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!