*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग शिवसेनेची तालुका समन्वय समिती स्थापन; जि.प. व पं.स. निवडणुकीची तयारी सुरू..*
*दोडामार्ग : शुभम गवस*
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली तालुका समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत लक्ष्मण आयनोडकर, नगरसेवक चंदन गावकर, विजय जाधव, विनिता घाडी, माजी जि.प. सदस्य संपदा देसाई, मदन राणे, मिलिंद नाईक, संदेश राणे तसेच तिन्ही विभागप्रमुखांचा समावेश आहे.
उमेदवार निवड, आघाडीबाबत निर्णय व प्रचार यंत्रणा राबविणे ही समिती सर्वानुमते ठरवणार आहे. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी व विधानसभा प्रमुख कालिदास कांदळगावकर यांच्या सहकार्याने समिती काम करणार आहे.
येत्या निवडणुकांत पक्षाला यश मिळवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असल्याचे मत तालुका प्रमुख संजय गवस यांनी व्यक्त केले.

