महाराष्ट्र शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनी वाघेरी येथील वार्षिक जत्रौत्सवला जाऊन श्री लिंगेश्वर,गांगो माऊली व पावणादेवी मातेचे घेतले दर्शन.

महाराष्ट्र शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनी वाघेरी येथील वार्षिक जत्रौत्सवला जाऊन श्री लिंगेश्वर,गांगो माऊली व पावणादेवी मातेचे घेतले दर्शन.

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे यांनी वाघेरी येथील वार्षिक जत्रौत्सवला जाऊन श्री लिंगेश्वर,गांगो माऊली व पावणादेवी मातेचे घेतले दर्शन…*

*कणकवली ः संजना हळदिवे*

शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी वाघेरी येथील श्री लिंगेश्वर गांगो माऊली व पावणादेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाच्या वातावरणात व पारंपरिक पद्धतीने धूमधडाक्यात संपन्न झाला.
या जत्रोत्सवासाठी परिसरातील गावांसह मुंबई व बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित होते. संपूर्ण गाव परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
या पावन प्रसंगी महाराष्ट्र शिवसेना उपनेते श्री. संजयजी आग्रे तसेच फोंडाघाट सरपंच मॅडम सौ. संजना संजय आग्रे व परिवार यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहून वाघेरी येथील श्री लिंगेश्वर गांगो माऊली व पावणादेवी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर
प्रा. श्री. जगदीश राणे, माजी सरपंच श्री. संतोष राणे, श्री. चंद्रकांत गुरव (बुवा), श्री. महेंद्र राणे, श्री. प्रदीप राणे, श्री. किशोर राणे तसेच अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत
माननीय श्री. संजयजी आग्रे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माननीय आग्रे साहेबांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
तसेच फोंडाघाट सरपंच मॅडम सौ. संजना संजय आग्रे यांचेही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!