वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालययाचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार संपन्न

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालययाचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालययाचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार संपन्न*

*मालवण : (प्रतिनिधी)*

शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागातून सादर होणारा भव्य पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण असणार आहे. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विजय उर्फ बाळाशेठ चिंदरकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्गच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर हे भूषविणार आहेत. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर आणि विश्वस्त ऍड. एस. एस. पवार यांच्यासह संस्थापदाधिकारी उपस्थित राहणारं आहेत.

या स्नेहसंमेलनात देवांचा देव भगवान विष्णू यांच्या दहा प्रमुख अवतारांचे दर्शन रंगमंचावर साकारण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार असून, या नाट्यप्रयोगात नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. या पौराणिक महानाट्यात सुमारे ५०० विद्यार्थी सहभागी होत असून, भव्य रंगमंच, आकर्षक प्रकाशयोजना, ट्रिक सीन आणि अत्याधुनिक एलईडी स्क्रीनच्या साहाय्याने ‘दशावतार’ सादर केला जाणार आहे. सांस्कृतिक परंपरा, अध्यात्मिक मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या कलागुण व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

या वार्षिक स्नेहसंमेलनास पंचक्रोशीतील नागरिक, पालक, माजी विद्यार्थी व सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!