*”घर मातीचं!’ यावर कार्यशाळा संपन्न*

*”घर मातीचं!’ यावर कार्यशाळा संपन्न*

*कोंकण एक्सप्रेस*

*”घर मातीचं!’ यावर कार्यशाळा संपन्न*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

विकासाच्या नावाखाली मातीची घरे पाडून सिमेंट काँक्रिटची घरे बांधली जात आहेत. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर तसेच मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे. मातीशी तुटत चालेली नाळ पुन्हा तोडण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा अनुभव देण्यासाठी “घर मातीचं का आणि कसं बांधायचं?’ यावर चार दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
आर्किटेक्ट अजितकुमार परब आणि “डिझाईन जत्रा’चे प्रतिक धामनेर यांनी 6 ते 9 डिसेंबर कालावधीत ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राध्यापक, डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, आर्किटेक्टसह एकूण 50 प्रशिक्षणार्थी सहभागी होते. कार्यशाळेसाठी तुळस येथील मांगर फार्म स्टे आणि कुडाळ तालुक्यातील बांव गावाची निवड केली होती. यात प्रशिक्षणार्थींना जुनी जतन केलेली मातीची घरे आणि दगड मातीने नविन बांधलेली घरे दाखविण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मातीच्या घरांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. तसेच त्यांना मातीच्या घरांची आवश्यकता, त्याचे फायदे, त्याचा येणारा खर्च आदींची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे हवामानबदलावर मात करण्यासाठीच्या ठोस उपायांची माहिती सुद्धा देण्यात आली.
फोटोओळी – “घर मातीचं!’ यावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बहुसंख्य प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!