राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 100 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 100 प्रकरणे निकाली

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 100 प्रकरणे निकाली*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण 100 प्रकरणे निकाली काढून 30 लाख 88 हजार 495 रूपयांची वसूली करण्यात आली.
उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशाला अनुसरून वेंगुर्ला न्यायालयामध्ये 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यात दिवाणीकडील 6, फौजदारी 30 आणि वादपूर्व 64 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी कॅथॉलिक अर्बन बँक व सैनिक नागरी पतसंस्थेने ग्राहकांना विशेष सवलती दिल्यामुळे त्यांच्या प्रकरणामध्ये तडजोड झाली व प्रकरणे मिटविण्यात आली. लोकन्यायालयात पक्षकारांचा आपला वेळ व पैशाची बचत होते. दोन्ही पक्षकारांना योग्य तो न्याय मिळतो. त्यामुळे दोन्ही पक्षकारांमध्ये संबंध चांगले राहतात. लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ¬ा संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन न्यायाधीश एस.जी.चिवटे यांनी केले.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश एस.जी.चिवटे, पॅनेल सदस्य अॅड.पी.डी.नाईक, अॅड.डी.व्ही.झांटये, सरकारी अभियोक्ता अॅड.सरिता पवार, अॅड.प्रकाश बोवलेकर आदी उपस्थित होते. तर लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एस.एच.खेडेकर, एम.एम.राऊळ, वरिष्ठ लिपिक पी.पी.शिरसाट, एम.एम.केळजी, एच.व्ही.नाईक, कनिष्ठ लिपिक एस.ए.बिलये, के.के.वारंग, एस.जे.सापळे, एस.व्ही.धाकोरकर, एच.व्ही.डिसोजा, हेड बेलिफ मयेकर, बेलिफ एन.डी.जगताप, आर.जी.गावडे, शिपाई सिद्धाली कोनयेकर व दिनेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
फोटोओळी – राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश एस.जी.चिवटे, पॅनेल सदस्य अॅड.पी.डी.नाईक, अॅड.डी.व्ही.झांटये, सरकारी अभियोक्ता अॅड.सरिता पवार, अॅड.प्रकाश बोवलेकर व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!