*कोंकण एक्सप्रेस*
*माझ्यावरच्या वैयक्तिक रागामुळेच बँकेवर आरोप*
*वारंवार पराभव झाल्याने राजन तेलींचे मानसिक संतुलन बिघडले – मनीष दळवी*
*सिंधुदुर्ग दि. १६ डिसेंबर*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतक-यांची बँक आहे. कर्ज वाटप केल्याशिवाय कुठलीही बँक नफ्यात येत नाही. त्यामुळे नाबार्ड व सहकार खात्याच्या धोरणानुसार जिल्ह्यातील नवीन उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी कर्ज वाटप केले जात आहे.
बँकेने राजन तेली यांचे पुत्र प्रथमेश तेली, सर्वेश तेली यांना सहकर्जदार म्हणून तेली व त्यांची पत्नी यांना जमीन खरेदीसाठी साडे नऊ कोटीचे कर्ज दिले होते. त्यांनी वेळेत कर्ज न भरल्याने त्यांच्यावर बँकेने कायदेशीर कारवाई केली. त्या विरोधात ते न्यायालयात केले. न्यायालयाने ते कर्ज व्याजासहित व दंडासहित 15 कोटी 60 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. तो राग मनात धरुन सिंधुदुर्ग बँकेची बदनामी राजन तेली यांनी चालवलेली आहे. 2 वेळा बँकेत व अनेकदा विधानसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला.
सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक विठ्ठल देसाई, दिलीप रावराणे, महेश सारंग, गजानन गावडे, नीता राणे, समीर सावंत, बाळा मोरये, आत्माराम ओटवणेकर, बाबा परब, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँक अधिकारी उपस्थित होते.
मनीष दळवी म्हणाले, राजन तेली यांनी सातबारा उतारा दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरोडा पडला अशी बोंब मारणे ही चुकीचे आहे. जिल्ह्यातील ड्रेझिंग कंपनीला 32 कोटींचे कर्ज दिले आहे. त्याबदल्यात बँकेने अधिकची तारण व्यवस्था 32 कोटींची घेतली आहे. बँकेकडून सुरक्षित कर्ज पुरवठा केलेला आहे. बँक कर्ज देणं आणि त्यावर व्यवसाय करणे हा उद्देश आहे. त्यामुळेच नवीन संचालक मंडळ आल्यानंतर 75 कोटींवरुन 116 कोटी निव्वळ नफा झाला आहे. कर्ज पुरवठा केला त्याला घोटाळा म्हणणे चुकीचे आहे. नाबार्ड व सहकार खात्याच्या नियमानुसार कर्ज वितरण केलं जात आहे. वर्षभरात विविध संस्थांकडून 5 वेळा ऑडिट होते, त्यात चुका निदर्शनास आणल्या जातात, त्या 90 दिवसात दुरुस्ती केली जाते. त्यामुळे सातत्याने बँकेला ऑडिट वर्ग अ सातत्याने मिळाला आहे.
सिंधुदुर्ग बँक ही गेली 17 वर्षे माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी घौडदौड करत आहे. जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या सर्वांनी मागच्या अनेक वेळा खा. नारायण राणे यांच्या विचाराच्या पॅनेलला साथ दिली आहे. त्याच कारण खा. नारायण राणे यांचा या बँकेच्या कारभारावर आणि प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असतो. कुठलीही चुकीची गोष्ट बँकेच्या कारभारामध्ये होवू नये, याबाबतीत ते नेहमी दक्ष असतात. याची जाणीव जिल्हावासीयांना असल्यामुळेच पुन्हा पुन्हा नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या लोकांना बँकेत संधी सभासद देत आहेत. मी चेअरमन म्हणून कार्यरत असताना तेव्हा पासून मागची 4 वर्षे राणेंनी माझ्यावर जबाबदारी दिली. आणि माझ्या सोबत उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सहकारी संचालक, काही संचालक वेगवेगळ्या पक्षातून सुध्दा निवडून आलेले आहेत. बँक म्हणून काम करत असताना सर्व संचालक मंडळ एकमताने आणि एका भूमिकेने आणि धोरणानुसार काम करत आहोत. राणेंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सगळे निर्णय त्याच्या निर्दशनास आणूनच निर्णय घेतले जातात. नारायण राणेंची नेहमी एक भूमिका राहिलेली आहे की, या जिल्ह्यातल्या बेरोजगार, तरुणांना, उद्योजकांना सुध्दा घडवण्याचे काम या ठिकाणी शेतक-यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा बँकेने केलं पाहिजे. त्या दृष्टीकोनातून केंद्रात एमएससीबीचे मंत्री असताना सुध्दा त्यांनी देशभरातील पहिली जिल्हा बैंक ज्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांचा सुध्दा अॅप्लिकेबल करुन दिलं. या जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजक घडले पाहिजेत त्या दृष्टीने बैंक करत असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
अनेकवेळा जिल्ह्यातील काही लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असायचे. आपल्या जिल्ह्यातला बँकेचा कर्ज पुरवठा हा बाहेरच्या जिल्ह्यातल्या शेतीव्यवसायाला किंवा प्रक्रिया उद्योगाला का केला जातोय. त्यासाठी खा. राणेंनी ते मंत्री असताना शासनाच्या योजना देखील या बँकेच्या माध्यमातून लागू केल्या आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योजक पुढे येत नसल्याने बँकेचे ठेवी राज्यातील उद्योगांना सोबत घेऊन पतपुरवठा केला जावा, यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना शेती घेणे आणि विकास करणे, शेतीच्या माध्यमातून नवीन प्रकल्प उभे करणे याच्यासाठी जिल्हा बँक म्हणून आम्ही सातत्याने आग्रही असतो. त्याच्या मध्ये अधिक योग्य पद्धतीने पतपुरवठा केला जात आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्षांनी, जिल्हा बँकेबद्दल बँकेच्या संचालक मंडळाबद्दल केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चेअरमन म्हणून ते काय शिकले ? कुठला अभ्यास केला ? मागच्या आरोपानंतर उत्तर दिले नाही. कारण या खुर्चीला एक आचारसंहिता आहे. बँकेच्या ठेवी किंवा कर्जव्यवहार अन्य कुणाला उघड करू नये, अशी आचारसंहिता होती. जोपर्यंत कर्ज होते तोपर्यंत आम्ही बँकेचे हित जोपासण्यासाठी संयम ठेवून होतो. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने कर्जदार म्हणून तेलींना पूर्ण कर्ज भरण्याचे करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच ते बँकेवरील रागातून बिनबुडचे आरोप राजन तेली करत असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.
राजन तेली बँकेवर आरोप करण्यामागे मूळ कारण काय आहे? हे सभासदांना समजण्याची गरज आहे. राजन तेली यांच्या मुलांना 9 कोटी 60 लाख कर्ज शेत जमीन खरेदीसाठी देण्यात आले होते. त्या कर्जाच्या मंजुरीच्यावेळी त्यांना दोन वर्षे व्याज भरणे आवश्यक होते. हे कर्ज दिल्यानंतर त्यांनी दोन वर्षे व्याज भरले नाही. आपल्या या कर्जाची परतफेड करण्यासाठी व्यापारी गाळे विकण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला. हा अर्ज 2021 मध्ये आला होता. आमचे संचालक मंडळ आल्यानंतर ते गाळे विकण्यासाठी आम्ही परवानगी दिली तेव्हाच गाळे विकल्यानंतर पैसे भरायला सांगितले होते. त्यावेळी व्याजदर कमी कारणासाठी अर्ज तेलींनी दिला 15 टक्क्यांवरुन 14 टक्के व्याजदर करत त्यानुसार 43 लाख 20 हजार व्याजाची सवलत दिली गेली. व्याजाची सवलत देऊनही कर्ज थकबाकी झाली, तेव्हा बँकेने नोटीस दिली. थकबाकी कर्ज भरण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतरही जेव्हा थकबाकीदार म्हणून प्रतिसाद कर्जदारांकडून मिळाला नाही. तेव्हा बँकेने सहकार न्यायालयात दावा दाखल केला. मार्च 23 शेवटला थकबाकी भरली नाही. प्रथमेश तेली यांच्या एकाच कर्ज खात्यामुळे बँकेची 96 कोटी थकबाकी झाल्याने एनपी वाढला होता. न्यायालयीन बाबींमुळे कायदेशीर पाऊल उचलले. त्यावेळी आम्ही कर्जच घेतले नाही. आम्ही वापर चुकीचा केला नाही, असे वक्तव्य तेली यांच्याकडून केले जात होते. मात्र, बँकेने कायदेशीर कारवाई सुरु केली. त्यानुसार सहकार न्यायालयाने पूर्ण रक्कम भरण्याची ऑर्डर केली. सुनावण्या झाला त्यांच्या विरोधात आदेश झाले. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील त्यांच्या सर्व प्रॉपर्टी अॅट्याचमेंट झाली, असा कोर्टाचा आदेश झाला. पुढची कारवाई सुरु केल्यानंतर अर्धी रक्कम भरली. हायकोर्टाने जमीन विकून पैसे भरण्याचे आदेश झाले आहेत. त्यामुळे 15 कोटी 60 लाख रुपये दंडसाहित रक्कम भरायला लागली आहे. बँकेने त्यांना सोयी दिलेल्या आहेत. खरतर त्याच्यानंतर जिल्हा बँकेवर राजकीय द्वेशापोटी आरोप केलं आहेत. राजन तेलींना चुकीच्या पद्धतीने आरोप करण्याचे अधिकारी दिलेले नाहीत. पत्रकार परिषद घेताना बँकेचा लोगो वापरला आहे, त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनीष दळवी यांनी दिला आहे.
दरोडेखोर हा आरोप हास्यास्पद आहे. माझ्या किंवा पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरील वैयक्तिक राग, द्वेष काढण्याची ही जागा नाही. आ. निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. ते त्याच नेतृत्व मानत असतील तर त्यांचा सल्ला मानतील. आमचा जिल्हा छोटा असताना देखील रत्नागिरी, रायगड पेक्षा सिंधुदुर्ग बँक पुढे आहे. उलाढालीचा 4 हजार कोटींचा टप्पा 7 हजार कोटीपर्यंत जात आहोत. राजकीय द्वेश सहन करण्यासाठी मनीष दळवी सक्षम आहे. राजन तेलींचा अनेक पराभव झाल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या परिस्थितीत आहेत. राजकीय वादातून बँकेवर आरोप करू नका. अनेकांच्या मेहनत मुळे बँक उभी राहिली आहे. बँकेबद्दल प्रेम असेल तर वाद निर्माण करू नका. ही जिल्हावासीयांची बँक आहे. उज्ज्वल असा विश्वास आहे. देशाला आणि जिल्हा वासियांना अभिमान वाटेल असे काम आहे. विना व्याज कोणाला कर्ज देत नाही. कर्ज कुठलीही थकबाकी नाही. जो कोण थकबाकी असेल त्यावर कारवाई केली जात आहे. बँकेच्या व्यवसायाबाबत गैरसमज पसरवू नये, त्यामुळे त्यांच्यावर योग्यती कारवाई केली जाईल. यापुढे चुकीच्या पद्धतीने बँकेची बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा बैंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिला आहे.

